सर्व आर्थिक वर्गांतील सुवर्णकर्जाची आर्थिक संभाव्यता खुली करणे - रवीश गुप्ता, बिझनेस हेड- गोल्ड लोन

by Priya Jadhav

आर्थिक सुरक्षितता आणि स्थैर्य प्राप्त करण्याच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे, कालातीत आकर्षणाचे केंद्र असलेले सोने  एक धोरणात्मक असेट वर्ग म्हणूनही उदयाला आले आहे. पिढ्यानुपिढ्या हस्तांतरित होत आलेल्या सोन्यामध्ये आर्थिक चातुर्याचा अर्क सामावला आहे. अनिश्चिततेच्या काळात हेच सोने दिलाशाचा दृढ स्तंभ झाले आहे. ऐहिक व भौगोलिक सीमांपलीकडील अंगभूत मूल्यामुळे सोने एक समायोजनशील व वैविध्यपूर्ण संसाधन ठरले आहे. बाजारातील चढउतारांच्या काळात सोने ही एक रोख पैशात रूपांतर करण्याजोगी जीवनरेखा ठरते, स्थैर्याची निश्चिती ठरते.  

डिजिटल पहाट आणि गोल्ड लोन्सचे आरोहण

आधुनिक युगाततंत्रज्ञान व वित्तीय बाबींच्या संयोगातून एका गतीशील वित्तीय संसाधनाचा जन्म झाला आहेते संसाधन म्हणजे गोल्ड लोनह्या आधुनिक साधनामुळे व्यक्तींना प्रस्थापित नॉन-बँकिंग फायनान्शिअल कंपन्यांकडे (एनबीएफसीकिंवा प्रतिष्ठित वित्तीय संस्थांकडे कर्जासाठी अखंडितपणे अर्ज करत राहण्याची क्षमता प्राप्त होते आणि हे सगळे त्यांना घरबसल्या आरामात करता येतेतंत्रज्ञानाचा प्रसार हे आधुनिकतेचे लक्षण आहे आणि भारतातील सुवर्णकर्ज बाजारपेठेच्या तेजीत तंत्रज्ञानाच्या प्रसाराने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे

गोल्ड लोन एनबीएफसी आणि बँकांच्या सुवर्णकर्ज एयूएममध्ये (व्यवस्थापनाखालील मालमत्तागेल्या दशकभरात 13 टक्के सीएजीआरने झालेली स्थिर वाढ ह्या डिजिटल कायापालटाला मिळालेली पावती आहेमागील पाच वर्षांत वाढ अधिक तीव्र म्हणजे 22 टक्के CAGRने एकत्रित झाली आहे आणि कोविड साथीनंतरच्या काळात  (FY20-FY23) ती 27 टक्क्यांवर पोहोचली आहेह्या लक्षणीय उन्नतीचे श्रेय केवळ वाढत्या जागरूकतेला नव्हेतर विविध उद्योगक्षेत्रांमध्ये झपाट्याने झालेल्या डिजिटल रूपांतरणालाही द्यावे लागेल.  

गोल्ड लोन्सआर्थिक उपयोजनांतील रामबाण उपाय

निवडलेला कर्जपुरवठादार बँक असो किंवा एनबीएफसी असोसुवर्णकर्जाचा पट विस्तृत आहेसुवर्णकर्जामध्ये कर्जाऊ रकमेच्या विनियोगावर निर्बंध नसतातहा वित्तीय शॅमेलिऑन (हवे तसे वापरले जाण्याजोगे कर्जशिक्षण किंवा लग्नसोहळ्यांचे साजरीकरण आदी व्यक्तिगत आकांक्षा पूर्ण करण्यात मदत करतो तसेच कार्यकारी भांडवल मजबूत करणे किंवा विस्ताराला मदत करणे अशा व्यवसायातील गरजाही भागवतोकाळाच्या ओघात सुवर्णकर्जाने एक प्रतिष्ठित वित्तीय उत्पादन म्हणून स्वत:साठी स्थान निर्माण केले आहेवैविध्य आणि परिणामकारकता ही ह्या कर्जाची वैशिष्ट्ये आहेत.   

भारतातील गोल्ड लोन बाजारपेठेतील स्थित्यंतर

काळाच्या ओघातभारतातील सुवर्णकर्ज बाजारपेठेची रूपरेखा सुक्ष्मरित्या उत्क्रांत झाली आहेह्यामध्ये व्यक्ती व व्यवसायांची वाढती मागणी दिसून येत आहेह्या बदलाला पारंपरिक बँका आणि नवीन एनबीएफसी सुवर्णकर्ज कंपन्या ह्या दोघांकडून चालना दिली जात आहेह्या विशेष एनबीएफसींनी बाजारपेठेच्या विस्तारात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

कर्ज घेण्याच्या पद्धतीमध्ये लक्षणीय बदल होत आहेकारणव्यक्ती व व्यवसाय अनौपचारिक कर्जदात्यांकडून प्रस्थापित कर्जदात्यांकडे वळत आहेतह्या स्थित्यंतरातून वित्तीय समावेशकता व पारदर्शकता ह्यांच्या दिशेने चालेलली प्रगती दिसून येते.   

आर्थिक समावेशकतेकडे जाणारी खरीखुरी शिडी

सुवर्णकर्ज हा आर्थिक समावेशनाकडे जाणारा सन्माननीय मार्ग ठरला आहेत्यामुळे वैविध्यपूर्ण आर्थिक स्तरांमधील समतोल जोपासला जात आहेवेगाने व सहज कर्ज उपलब्ध होत असल्यामुळे निम्न-उत्पन्न श्रेणीतील कुटुंबांची लवचिकता वाढत आहेते खडतर काळावर मात करण्यासाठी सुसज्ज होत आहेतआर्थिक नियोजनामध्ये सुवर्णकर्जांचे एकात्मीकरण करता येत असल्यामुळे मध्यम-उत्पन्न श्रेणीतील कुटुंबांना दिलासा मिळत आहेअगदी उच्चभ्रू वर्गांमध्येही सुवर्णकर्जाकडे सुरक्षित वैविध्यपूर्ण साधन म्हणून बघितले जात आहे.

सुवर्णकर्जाचा वापर कल्पकतेने केल्यामुळे वर्तमान कर्जांमध्ये वाढ करण्याचा एक उपयुक्त मार्ग खुला होत आहेत्यामुळे एखाद्याजवळील सोन्याच्या स्वरूपातील मालमत्तेचे अंगभूत मूल्य जोपासले जात आहेह्या कल्पक शिडीमुळे अनावश्यक अर्ज प्रक्रियांना फाटा देणे शक्य होत आहे आणि शिस्तबद्ध कर्जवितरणाच्या युगात प्रवेश निश्चित झाला आहेह्या दृष्टिकोनातील आर्थिक चातुर्यामुळे कर्जदारांना अव्वाच्या सव्वा व्याज न भरता पूरक कर्जे उपलब्ध करून घेता येत आहेत.   

गोल्ड लोन्सअसुरक्षित पर्यायांच्या विरोधातील टोक

व्यक्तिगत कर्जासारख्या असुरक्षित पर्यायांपुढे सुवर्णकर्जाचा पर्याय ठेवून बघितला असतात्यातील भेद स्पष्ट होतातस्पर्धात्मक व्याजदरांवर दिले जाणारे सुवर्णकर्ज आर्थिक शहाणपणाचा उत्कृष्ट नमुना ठरतेजलद रोखता देणाराप्रचंड प्रमाणात व्याजाचा बोजा नसलेला एक विचारी मार्ग ठरतोहे वित्तीय साधन आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य तर आहेचशिवायकर्जदाराला आर्थिक मोकळीकही देते.   

थोडक्यातपारंपरिक पद्धतींपासून आधुनिक वित्तीय मालमत्ता म्हणून झालेला सुवर्णकर्जाचा कायापालट हा भारताच्या आर्थिक पटलातील सुवर्णकर्जाचे महत्त्व स्पष्ट करतोआर्थिक वर्ग हे गतीशील उत्क्रांतीतून जात असतानासुवर्णकर्ज हा सर्वांना एकत्र आणणारा घटक म्हणून ठामपणे उभा आहेविविध सामाजिक समुदायांच्या अनेकविध गरजा पूर्ण करत आहेआर्थिक समावेशन जोपासण्याची सुवर्णकर्जाची क्षमता अजोड आहेत्यामुळे पूर्वीच्या कर्जांना पूरककर्ज उपलब्ध होऊ शकते आणि कर्जदारांना एक चतुर आर्थिक साधन पुरवून सुवर्णकर्ज ह्या क्षेत्रातील बिनीचा शिलेदार ठरला आहे.

अंगभूत वित्तीय साधनांमध्ये सुवर्णकर्जांची झळाळी अधिक आहेकारणहे कर्ज सुलभसुरक्षित आणि सहज उपलब्ध होण्याजोगे आहेत्यामुळे आर्थिक सक्षमीकरणाचा एक सौहार्दपूर्ण मार्ग खुला होत आहे.

 

Comments

Popular posts from this blog

KERALA TOURISM WOOS TOURISTS

Excellent Classes organises 34th edition of HUES, felicitates its meritorious students

Haier Launches Inverter Expert Air Conditioner Series - A New Dawn in Air Conditioning