मकरंद अनासपुरेंच्या ‘छापा काटा’ चित्रपटाचा ट्रेलर संपूर्ण महाराष्ट्रात घालतोय धुमाकूळ!!

 by Priya Jadhav

मुंबई: अभिनेते मकरंद अनासपूरे आणि तेजस्विनी लोणारी यांची जोडी असणारा ‘अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड’ प्रस्तुत ‘छापा काटा’ चित्रपटाचा नुकताच पोस्टर लॉंच होऊन प्रेक्षकांमध्ये कमालीचा उत्साह पहायला मिळाला होता. चित्रपटाच्या विलक्षण पोस्टरनंतर २४ नोव्हेंबर २०२३ रोजी प्रत्येकाचं चित्त वेधून घेणारा ‘छापा काटा’ चित्रपटाचा ट्रेलर लॉंच झाला असून ट्रेलर संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार धमाका उडवत आहे.

‘छापा काटा’ चित्रपट १५ डिसेंबर २०२३ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाची निर्मिती श्री. सुशीलकुमार अग्रवाल यांनी केली असून पटकथा आणि दिग्दर्शन संदीप मनोहर नवरे यांनी केली आहे. छायाचित्रण गौरव पोंक्षे, बिजनेस हेड (अल्ट्रा डिजिटल स्टुडिओ) अरविंद अग्रवाल, संकलक मीनल राकेश म्हादनाक, कार्यकारी निर्माता दर्शन चोथाणी, बिजनेस हेड (अल्ट्रा मराठी) श्याम मळेकर, क्रिएटिव्ह निर्माता रजत अग्रवाल आणि सोशल मिडिया अँड डिजिटल मार्केटिंग ब्रिन्दा अग्रवाल आहेत.

ट्रेलरमध्ये करामती नाम्या एका श्रीमंत मुलीशी लग्नाचा करार करून धमाल विनोदी गोंधळ घालताना दिसत आहे. नाम्या म्हणजेच मकरंद अनासपूरे आणि श्रीमंत मुलगी अभिनेत्री तेजस्विनी लोणारी असून मोहन जोशी, अरुण नलावडे, ऋतुराज फडके, पंकज विष्णु, सुश्रृत मंकणी, रीना अग्रवाल आणि विजय पाटकर या सुप्रसिद्ध अभिनेत्यांच्या विनोदाचा डबल धमाल चित्रपटात पहायला मिळणार आहे. 

तूर्तास पोस्टर आणि धमाकेदार ट्रेलर बरोबरच प्रत्येक रसिकाच्या मनाला प्रेमाचा ओलावा देणारं चित्रपटातील ‘कुणी समजवा माझ्या मनाला’ गाणं प्रदर्शित झाले असून गाण्याला संपूर्ण महाराष्ट्रातून भरमसाठ प्रतिसाद येत आहे. गाण्याला अभय जोधपुरकर आणि आर्या आंबेकर यांनी आपले स्वर दिले असून गौरव चाटी, गणेश सुर्वे आणि मुकुल काशीकर यांनी संगीतबद्ध केले आहे.

“महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात असणाऱ्या प्रत्येक रसिकाला त्याच्या आवडीचं मनोरंजन अनुभवता यावं यासाठी आम्ही ‘छापा काटा’ सारखा संपूर्ण धमाल विनोदी मनोरंजन असणारा चित्रपट महाराष्ट्रभर प्रदर्शित करत आहोत. नुकताच प्रदर्शित झालेला ट्रेलर आणि गाण्याला प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहून चित्रपटालाही जोरदार प्रतिसाद असणार यात शंका नाही.” असे अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा.लिमिटेडचे सी.ई.ओ. श्री सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले.

Comments

Popular posts from this blog

Excellent Classes organises 34th edition of HUES, felicitates its meritorious students

KERALA TOURISM WOOS TOURISTS

Imran Khan joins Ariel & Whirlpool's #ShareTheLoad Movement