आंतरराष्ट्रीय प्रवास करून 'मोऱ्या' येत्या १२ जानेवारी २०२४ रोजी महाराष्ट्रातील चित्रपटगृहांत रसिकांच्या भेटीला!
by Priya Jadhav
मुंबई : लंडन येथील 'सोहोवाला कोर्ट हाऊस हॉटेल सिनेमा' या लंडनच्या आयकॉनिक सिनेमा हॉलमध्ये पहिल्यांदा 'प्रीमियर शो' करण्याचा मान "मोऱ्या" या मराठी चित्रपटाने मिळवून, युरोपमधील प्रेक्षकांची हाऊसफुल्ल पसंती मिळविली आहे. ‘कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात' "मोऱ्या"चा टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. तेव्हा पासूनच या चित्रपटाविषयी कुतूहल वाढू लागले होते. 'एलएचआयएफएफ बार्सिलोना, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, 'खजुराहो आंतरराष्ट्रीय सिनेमहोत्सव', 'झारखंड आंतरराष्ट्रीय सिनेमहोत्सव-२०२२', 'पेनझान्स आंतरराष्ट्रीय सिनेमहोत्सव', 'अयोध्या फिल्म फेस्टिव्हल', 'लेक सिटी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल', 'बॉलिवूड इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल' इत्यादी राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय महोत्सवांत "मोऱ्या"ने ‘उत्कृष्ट चित्रपटा’चा बहुमान मिळविला आहे. आता नव्या वर्षात येत्या १२ जानेवारी २०२४ रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
कान्ससह विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये आमच्या पहिली निर्मिती असलेल्या 'मोऱ्या' या चित्रपटाने जाणकार रसिक समीक्षकांचे लक्ष वेधले होते. युके मधील प्रीमियर शो पाहून बराच वेळ स्तब्ध होतो. चित्रपटाची कथा, मांडणी, अभिनय व सादरीकरण पाहून त्यांना गहिवरून आले होते. 'मोऱ्या' हे पात्र मनात अस्वस्थता, चलबिचल, काहूर निर्माण करते अशी प्रतिक्रिया तेथील अनेक प्रेक्षकांनी बोलून दाखविली. हाच अनुभव युरोपसह, महाराष्ट्रातील काही खाजगी शोज्'च्या वेळी येत असल्याचे अभिनेते लेखक दिग्दर्शक जितेंद्र बर्डे सांगतात.
एका सफाई कर्मचाऱ्यांची अत्यंत विलक्षण भावस्पर्शी कथा 'मोऱ्या' या चित्रपटात रेखाटण्यात आली आहे. ती साकारण्यासाठी अभिनेता जितेंद्र बर्डे यांनी खास मेहनत घेतली आहे. त्यांनी केलेला सहज संयमी नैसर्गिक अभिनय रसिकांच्या मनात घर करीत आहे. विषयाच्या जातकुळीनुसार धुळे जिल्ह्यातील 'पिंपळनेर या ठिकाणी चित्रपटाचे चित्रीत करण्यात आहे. मूळ पिंपळनेरच्या जितेंद्र बर्डे यांची ही पहिलीच कलाकृती आहे. चित्रपटाच्या माध्यमातून या परिसराचे सौंदर्य जगभर पोहचविल्याचे समाधान जितेंन्द्रसह सर्वांनाच असून या निर्मितीसाठी निर्माती तृप्ती कुलकर्णी, राजेश अहिवले, सहनिर्माते प्रेरणा धजेकर, पूनम नागपूरकर, मंदार मांडके, राहुल रोकडे, सचिन पाटील यांची खंबीर साथ लाभली आहे.'टॉर्टुगा मोशन पिक्चर्स' निर्मित 'मोऱ्या'मध्ये उमेश जगताप, संजय भदाणे, धनश्री पाटील, राहुल रोकडे, सुरज अहिवळे, रुद्रम बर्डे, कुणाल पुणेकर, शिवाजी गायकवाड, दीपक जाधव, विजय चौधरी, अविनाश पोळ, रुपाली गायके आणि जितेंद्र पुंडलिक बर्डे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटात उमेश जगताप, संजय भदाणे, धनश्री पाटील, रुद्रम बर्डे, कुणाल पुणेकर आणि शीर्षक भूमिकेत जितेंद्र बर्डे यांनी काम केले आहे. सफाई कामगार ते पिंपळनेरचा सरपंच हा 'मोऱ्या' उर्फ सीताराम जेधेचा थक्क करणारा जीवनप्रवास नेमका आहे तरी कसा? हे जाणून घेण्यासाठी येत्या १२ जानेवारी २०२४ रोजी मोऱ्या महाराष्ट्रातील आपल्या जवळच्या चित्रपटगृहांमध्ये नक्की भेट द्या.
Comments
Post a Comment