जीएसपी क्रॉप सायन्‍सचे देशांतर्गत व आंतरराष्‍ट्रीय विस्‍तारीकरणाच्‍या माध्‍यमातून महसूलामध्‍ये वाढ करण्‍याचे लक्ष्‍य

by Priya Jadhav

 


बाजारपेठेतील उपस्थिती आणि महसूल वाढवण्याच्या प्रयत्नात कृषी रसायन उत्पादक कंपनी जीएसपी क्रॉप सायन्सने  महत्वाकांक्षी योजना आखली आहेज्याअंतर्गत देश-विदेशातविशेषतः ब्राझीलमध्ये विस्तार करण्‍यात येणार आहे. आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्‍ये १,६०० कोटी रूपयांचा महसूल संपादित करणाऱ्या कंपनीचा २०२४-२५ पर्यंत १,८०० कोटी रूपयांचा महसूल संपादित करण्‍याचा मनसुबा आहे. तसेच त्‍यानंतरच्‍या ३ ते ४ वर्षांमध्‍ये २,५०० कोटी रूपयांचा महसूल गाठण्‍याचे दीर्घकालीन ध्‍येय आहे.


चीनवरील अवलंबन कमी करणे 

आपल्‍या धोरणात्‍मक आराखड्याचा भाग म्‍हणून जीएसपी क्रॉप सायन्स कच्च्या मालासाठी चीनवरील आपले अवलंबन कमी करत आहे. कंपनीने आपल्‍या उत्पादनांसाठी आवश्यक मध्यस्थ निर्माण करण्याची योजना आखली आहे. गुजरातमधील दहेज येथील तिसऱ्या उत्पादन युनिटमध्ये१०० ते ११० कोटी रूपयांची गुंतवणूक करत हे ध्‍येय गाठणे शक्‍य होईलजेथे सुरूवातीला चार मध्‍यस्‍थ निर्माण करण्‍याचे निर्धारित करण्‍यात आले आहे. 


संशोधन व विकासावर लक्ष केंद्रित 

कंपनीने संशोधन व विकासामध्‍ये लक्षणीय प्रगती केली आहेजेथे जम्‍मू आणि अहमदाबादगुजरा येथे दोन समर्पित आरअॅण्‍डडी केंद्रे आहेत. कंपनीने आरअॅण्‍डडीसाठी आपला ७ ते ८ टक्‍के महसूल निर्धारित केला आहे आणि अभिमानाने १५० हून अधिक पेटण्ट अॅप्‍लीकेशन्‍स केले आहेतज्‍यापैकी कंपनीच्‍या उत्‍पादनांसाठी ७० पेटण्‍ट्सना मान्‍यता मिळाली आहे.


कर्मचारीवर्ग व बाजारपेठ हिस्‍स्यामध्‍ये वाढ करणे 

दहेज येथील आगामी केंद्र दोन विद्यमान उत्‍पादन युनिट्सना सुविधा देण्‍यासह कंपनीला आपल्‍या कर्मचारीवर्गामध्‍ये २०० पर्यंत वाढ होण्‍याची अपेक्षा आहे. व्‍यवस्‍थापकीय संचालक भावेश शाह यांना भारतातील कंपनीचा बाजारपेठ हिस्‍सा आगामी वर्षांमध्‍ये ६ ते ७ टक्‍क्‍यांपर्यंत वाढण्‍याची अपेक्षा आहे. या वाढीमुळे विशेषत: हर्बीसाइड (तणनाशक) पोर्टफोलिओमध्‍ये उत्‍पादन विस्‍तारीकरणला चालना मिळेल आणि भारताच्‍या पूर्व व ईशान्‍येकडील प्रदेशांमध्‍ये उपस्थिती वाढेल. जीएसपी क्रॉप सायन्‍सचा सध्‍या भारतात ५० हून अधिक ब्रॅण्‍ड्सचा पोर्टफोलिओ आहे. 


ब्राझीलवर फोकससह जागतिक विस्‍तारीकरण 

आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावर देशांतर्गत बाजारपेठेतून निर्यातीचे प्रमाण १५:८५ आहेजेथे निर्यात जवळपास ६० देशांपर्यंत पोहोचली आहे. कंपनीने नुकतेच ब्राझीलमधील आपला व्‍यवसाय विस्‍तारित केला आहे आणि लॅटिन अमेरिका देशामध्‍ये २ ते ३ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स महसूल संपादित करण्‍याची योजना आहे. कंपनीच्‍या भावी ध्‍येयामध्‍ये तेथे फॉर्म्‍युलेशन युनिट स्‍थापित करण्‍याचा समावेश आहे. ग्‍लोबल बिझनेस अॅण्‍ड स्‍ट्रॅटेजी हेड व्‍ही. एन. राजेश यांनी ब्राझीलमध्ये कार्यसंचालन सुरू करण्यापूर्वी बाजारपेठेचे नियम आणि गुंतागूंत समजून घेण्याच्या महत्त्वावर भर दिला.       

Comments

Popular posts from this blog

Excellent Classes organises 34th edition of HUES, felicitates its meritorious students

KERALA TOURISM WOOS TOURISTS

Imran Khan joins Ariel & Whirlpool's #ShareTheLoad Movement