'प्राणाहून प्रिय शिवसेनेचे हिंदुत्व' विषयावरील लेख असलेला दिवाळी अंक दिला भेट
डॉ. नीलम गोऱ्हे यांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दीपावलीनिमित्त शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीवर सदिच्छा भेट 'प्राणाहून प्रिय शिवसेनेचे हिंदुत्व' विषयावरील लेख असलेला दिवाळी अंक दिला भेट by Priya J मुंबई, ता. २५ : शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवजी ठाकरे यांना दीपावलीनिमित्त आज मातोश्री येथे भेट घेऊन शिवसेना उपनेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती ना. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी डॉ. गोऱ्हे यांचा 'शिवसेनेचे हिंदुत्व' या विषयावरील लेख प्रसिद्ध झालेला दैनिक सकाळचे उपसंपादक विनोद राऊत यांनी संपादित केलेला 'अवतरण' हा दिवाळी अंक त्यांनी श्री. ठाकरे यांना भेट दिला. अमरावती, यवतमाळ, नंदुरबार धडगाव भागात शेतकरी आत्महत्या अधिक प्रमाणात झाल्या आहेत. आदिवासी भागातील महिला अत्याचाराच्या घटनांकडे बहुतेक वेळा दुर्लक्ष होताना दिसत आहे. शेतकरी आणि महिलांच्या प्रश्नावर या भागात एखादा दौरा करावा अशी विनंती यावेळी त्यांनी केली. यावर लवकरच सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे श्री. ठाकरे यांनी सांगितले. यानिमित्ताने पुढील काळातील राज्यात करावयाच्या कामाबद्द...