अभ्युदय बँक खातेधारकांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी आमची युनियन प्रयत्नशील - आनंदराव अडसूळ


by Priya Jadhav

शुक्रवार दि.24/11/2023 रोजी रिझर्व बँकेने Banking Regulation Act 1949 च्या कलम 36 AAA अन्वये मुंबईतील बहुराज्यीय सहकारी बँक असलेल्या अभ्युदय को- ऑप. बँकेचे संचालक मंडळ पुढील 12 महिन्यासाठी बरखास्त करुन प्रशासकाची नेमणूक केली आहे.

अभ्युदय बँकेची स्थापना मुंबईतील काळाचौकी सारख्या कामगार वस्तीतील अभ्यूदय नगरमध्ये अभ्यूदय या नावाने 1965 साली करण्यात आली. अल्पावधीतच मुंबईतील इतर अनेक सहकारी बँकांना मागे टाकून या बँकेने मोठया प्रमाणात आर्थिक भरारी घेतली. आज भारतातील जवळपास 1540 सहकारी बँकांमध्ये अभ्यूदय सहकारी बँकेचा क्रमांक चौथा लागतो. या बँकेने अनेक स्थित्यंतराचा सामना करत तसेच अनेक प्रकारचे आर्थिक अडथळे पार करुन आपला कारभार चढत्या क्रमानेच चालू ठेवलेला आहे. पंरतु करोना सारख्या जागतीक महामारीमुळे भारतातीलच काय परंतु संपूर्ण जगभरातील बँका अडचणीत आल्या. सहकारी बँकांना राज्य किंवा केंद्र शासनाकडून कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत मिळत नसल्याने सहकारी बँकांना सावरण्यासाठी अधिक कालावधी लागत आहे.

उपरोक्त बाबी लक्षात घेता अभ्यूदय बँक काही प्रमाणात आर्थिक संकटात सापडली असल्याने 31 मार्च 2023 अखेर बँकेस रु.193 कोटी तोटा सहन करावा लागला. खरे पाहता नफा तोटा हा व्यवसायाचा भाग असतो. आज फायदयात असलेल्या बँका उद्या तोटयात येऊ शकतात. त्याचप्रमाणे तोटयातील बँका देखील अल्पावधीत फायदयात येऊ शकतात. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे जवळपास 16 राष्टीयकृत बँका मोठया प्रमाणात तोटा सहन करुन आज फायदयात आलेल्याचे दिसून येते.

सध्या अभ्युदय को- ऑप. बँकेच्या महाराष्ट्र, कर्नाटक व गुजरात या राज्यांमध्ये एकूण 109 शाखा कार्यरत आहेत. बँकेचे सध्याचे भांग भांडवल रु.216 कोटी असून बँकेच्या एकूण ठेवी रु.10 हजार कोटी, बँकेची एकूण कर्जे रु.6300 कोटी तसेच खेळते भांडवल रु.13 हजार कोटी आहे. बँकेमध्ये एकूण साधारणपणे 2800 कर्मचारी/अधिकारी कार्यरत असून ते कर्मचारी/अधिकारी उत्कृष्ट सेवा देऊन बँकेंस उर्जिता अवस्थेत आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. आमच्या आतापर्यंतच्या प्रदिर्घ अनुभवातून खात्रीपूर्वक सांगू इच्छितो की, अभ्यूदय बँक लवकरच आर्थिक फायदयामध्ये आलेली दिूसन येईल.

मी गेली 38 वर्षे मुंबईत आणि राज्यातील 10 जिल्हयात सहकारी बँकांतील कर्मचारी अधिकाऱ्यांच्या युनियनचे नेतृत्व करीत आहे. अभ्यूदय बँकेमध्ये देखील आमची युनियन गेली 40 वर्षापासून कार्यरत आहे. परंतु काही अघटीत बाबींमुळे गेल्या 4 वर्षापासून अभ्युदय बँकेत स्थानिक पातळीवरील व्यवस्थापन धार्जिणे युनियन कार्यरत आहे. तरी देखील संपूर्ण सहकारी चळवळ आणि त्यावर अवलंबून असणाऱ्या इतर घटकांबरोबरच कर्मचारी/अधिकारी यांच्या भविष्याची काळजी वाहण्याचे काम आंम्ही निरंतरपणे करीत आलो आहोत. यास्तव आंम्ही अभ्युदय बँकेतील कर्मचारी अधिकारी यांना देखील वाऱ्यावर सोडणार नाही, हे खात्रीपूर्वक सांगतो.

रिझर्व बँकेने अभ्युदय सहकारी बँकेवर उच्च दर्जाच्या प्रशासकाची नेमणूक करुन त्याच दर्जाच्या सहाय्यकांची नेमणूक देखील केली आहे. सदरच्या प्रशासक मंडळाची नेमणूक ही बँकेचे सभासद, ठेवीदार, कर्जदार, कर्मचारी/अधिकारी यांचे भवितव्य उज्वल करण्याच्या उद्देशाने केली आहे. बँकेंचा सर्व आर्थिक व्यवहार नित्य नियमाप्रमाणे चालू राहणार असून अभ्युदय बँकेंवर इतर कोणतेही आर्थिक निर्बंध लादलेले नाहीत. बँकेचा आर्थिक व्यवहार नियमानुसार चालवून व्यवस्थापकीय व प्रशासकीय शिस्त लावण्याचे काम प्रशासकीय मंडळ करणार आहे.

आंम्ही बँकेंच्या सर्व घटकास शाश्वत करीत आहोत की, प्रशासकीय मंडळाच्या नेमणूकीमुळे बँकेच्या आर्थिक स्थेर्यास कोणतीही बाधा पोचणार नाही. उलट बँक सुस्थितीत येईल यासाठी प्रशासकीय मंडळ प्रयत्नशील राहणार आहे. आतापर्यंतचा अनुभव सांगतो की, आर्थिक संकटात सापडलेल्या सहकारी बँकांवर रिझर्व बँकेने प्रशासकीय मंडळ नेमून सर्व बँका सुस्थितीत आणलेल्या आहेत, याचा अर्थ अभ्युदय बँकेच्या ठेवीदारांसाठी ठेवी तसेच सभासदाचे भाग भांडवल आज देखील सुरक्षित आहेत. त्यामुळे सर्वसामान्य खातेदारांनी, ठेवीदारांनी अजिबात घाबरुन जाण्याचे कारण नाही. आंम्ही ही बँक पुन्हा कशी सुस्थितीत येईल यासाठी प्रशासकीय मंडळास सहकार्य करु. सर्वसामान्य खातेदार व ठेवीदारांनी सुध्दा विश्वास ठेऊन सहकार्य करावे.

Comments

Popular posts from this blog

Imran Khan joins Ariel & Whirlpool's #ShareTheLoad Movement

KERALA TOURISM WOOS TOURISTS

Are ‘Unseen Forces’ Really Driving Political Vendetta Against Darwin Platform Chief Ajay Harinath Singh?