N D Studio to host Carnival in Presence of Several Artists/ A family Cine Tourism Attraction
by Priya Jadhav
मुंबई, ता. २३ :महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळातर्फे २५ ते ३१ डिसेंबरपर्यंत कर्जत-खालापूर येथील एन. डी. स्टुडिओ येथे सकाळी १० ते ६ पर्यंत कार्निवलचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्निवलमध्ये खेळ, मनोरंजनासह सेलिब्रेटीसोबत गप्पाचा कार्यक्रम नियमितपणे संपन्न होणार आहे. त्यामुळे वर्षाखेरीस कौटुंबिक पर्यटनाचा आनंद लूटता येणार आहे.
पाच वर्षापासून सर्व वयोगटासाठी केवळ १४९९ रुपये कार्निवलचे तिकीट असून, एकाचवेळी २५ आणि त्यापेक्षा जास्त बुकिंग केल्यास १३९९ रुपये तिकीट आकारण्यात येणार आहे. तिकीट बुकिंग ऑनलाइन www.ndartworld या संकेतस्थळावर व स्टुडिओच्या ठिकाणी ऑफलाईन उपलब्ध आहे. या कार्निवलला
पर्यटकांनी भेट द्यावी, असे आवाहन व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांनी केले आहे.
चौकट
लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष उपक्रम
- सांताक्लॉज मॅस्कॉट
- कार्टून मॅस्कॉट
- टॅटू मॅस्कॉट
- रोमिंग जगलर
- रोमिंग वॉकर
- मिकी माऊस बलून
- ट्रॅम्पोलीन
- ३६० सेल्फी बूथ
- स्टोरी पपेट शो (२५- ३० मिनिट)
- मॅजिक शो
चौकट
कलाकारांची मांदियाळी
* कविता लाड : २५ डिसेंबर, दु. ४ ते ६
* सुव्रत जोशी व सखी गोखले : २६ डिसेंबर, दु. ४ ते ६
* अदिती सारंगधर : २७ डिसेंबर, दु. ४ ते ६
* विराजस कुलकर्णी, उर्मिला कोठारे, विक्रम गायकवाड : २८ डिसेंबर, दुपारी १२ वाजता
* आनंद इंगळे : २९ डिसेंबर, दु. ४ ते ६
* डॉ. गिरीश ओक, ३० डिसेंबर, दु. ४ ते ६
* संजय मोने : ३१ डिसेंबर, दु. ४ ते ६
या कलाकारांसोबत गप्पांचा कार्यक्रम रंगणार आहे.
*जनसंपर्क विभाग
*दादासाहेब फाळके चित्रनगरी
*वृत्तनिवेदन
*१२४/२०२५


Comments
Post a Comment