कलाकार आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत रंगली ‘अविका एंटरटेन्मेंट’च्या सौंदर्य स्पर्धेची अंतिम फेरी; गौरव हजारे, गौरी टीकले, श्रद्धा पोतदार ठरले विजेते


by Priya Jadhav

रवी जाधव, सोनाली कुलकर्णी, अनिकेत विश्वासराव, प्राजक्ता माळी यांच्या उपस्थितीत रंगला ‘अविका एंटरटेन्मेंट’च्या सौंदर्य स्पर्धेचा फिनाले


तरुणाईला व्यासपीठ देणा-या ‘अविका एंटरटेनमेंट’ आयोजित ‘फॅशन आयकॉन २०१९ सीजन-०२’ या सौंदर्य स्पर्धेची अंतिम फेरी नुकतीच संपन्न झाली. आयोजक त्रुशाली फदाले आणि सचिन फदाले हे या स्पर्धेचे आयोजक आहेत. या सौंदर्य स्पर्धेत ‘मिस्टर गटात गौरव हजारे’, ‘मिस गटात गौरी टीकले’ आणि ‘मिसेस गटात श्रद्धा पोतदार’ विजेते ठरले.


माननीय श्री विजय शुक्ला VP लोकमत, डॉक्टर संजीव कुमार एसके ग्रुप, डॉक्टर दीपक बैंद मिस्टर हाउस आणि निर्माता दिग्दर्शक रवि जाधव आणि निर्माते सचिन नारकर अशा दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत ‘अविका एंटरटेन्मेंट’च्या सौंदर्य स्पर्धेची अंतिम सोहळा शानदार पध्दतीने रंगला.

मराठी चित्रपसृष्टीसह विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीमुळे देखील स्पर्धेच्या अंतिम फेरी सोहळ्याला चारचाँद लागले.  
स्पर्धेच्या प्राथमिक फेरीसाठी ५०० स्पर्धकांनी नोंदणी केली होती. दोन निवड चाचण्यांतून काटेकोरपणे निवडलेले तीन गटातील ३६ स्पर्धक अंतिम फेरीत सहभागी झाले. अंतिम फेरीचं परीक्षण मिसेज़ ग्लोब इंडिया अभिनेत्री इलाक्षि गुप्ता (तानाजी मूवी फेम) , मिस नवी मुंबई कविता मिश्रा, निर्माता दिग्दर्शक रवी जाधव, निर्माता-दिग्दर्शक अभिनेता विजय पाटकर यानी केलं. अभिनेता अनिकेत विश्वासराव, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, अभिनेत्री प्राजक्ता माळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

अंतिम फेरीत ‘गौरव हजारे’ विजेतेपदाचा मानकरी ठरला. ‘श्रेयस पाटील फर्स्ट रनर अप’, ‘अमित मोहिते सेकंड रनर अप’ ठरला. तसेच ‘मिस गटात गौरी टीकले’ विजेती ठरली तर ‘कश्मिरा वेदक फर्स्ट रनर अप’ आणि ‘पायल रोहेरा सेकंड रनर अप’ स्थानी राहिली. ‘मिसेस गटात श्रद्धा पोतदार’ विजेतेपदाच्या मानकरी झाल्या. ‘रुणाली पाटील आणि सुनीता प्रधान अनुक्रमे फर्स्ट रनर अप आणि सेकंड रनर अप’ या पारितोषिकांच्या मानकरी ठरल्या.
भानु डिझायनर व ३एम कलेक्शन घाटकोपर, सीझर नॉईस सलोन नवी मुंबई, यांच्याकडून विजेत्यांना एकूण ५ लाख रुपये पर्यंतची बक्षिसे तसेच द रोड हाउस ठाणे तर्फे लाईफटाईम फ्रि मेंबरशीप देण्यात आली.

उत्तमोत्तम सादरीकरण, परीक्षकांचे विचार करायला लावणारे प्रश्न अशा जल्लोषमय वातावरणात अंतिम फेरी रंगली.

Comments