‘स्टँड अप कॉमेडी शो’ आणणारा पहिला मराठी ओटीटी ‘अल्ट्रा झकास’!

 by Priya Jadhav

‘कॅफे कॉमेडी’ आठवड्याच्या प्रत्येक शुक्रवारी ‘अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटीवर!!

मुंबई: कलाक्षेत्र आणि अविरत संघर्ष यांची युगानुयुगे सांगड रचली गेली आहे. कलेची साधना करत संघर्षातून आपलं नवं विश्व उभारण्याचं स्वप्न प्रत्येक कलाकार पाहत असतो. ‘अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटी अशाच स्वप्नाळू कलाकारांसाठी 'कॅफे कॉमेडी’ या विनोदी कार्यक्रमांतर्गत झकास संधी घेऊन येत आहे. ‘कॅफे कॉमेडी’ प्रत्येक आठवड्याच्या शुक्रवारी ‘अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटीवर येणार असून कार्यक्रमाचा पहिला भाग ८ डिसेंबर २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे.

‘अल्ट्रा झकास’ हा आपल्या रसिक प्रेक्षकांसाठी भन्नाट ‘स्टँड अप कॉमेडी’ कार्यक्रम आणणारा पहिला मराठी ओटीटी आहे. महाराष्ट्रात दर बारा मैलावर मराठी भाषा एक वळण घेते. खांदेशी, वऱ्हाडी, मालवणी, कोल्हापुरी, सोलापुरी, बाणकोटी किंवा मराठवाड्याचा वेगळा बाज. अशाच वेगवेगळ्या भागातून वेगवेगळे कौशल्यावान कलाकार या कार्यक्रमात विनोद सादर करून प्रेक्षकांचं झकास मनोरंजन करणार आहेत.

सुप्रसिद्ध टीव्ही मालिकांचे लेखक आणि निर्माते आशिष पाथरे ‘कॅफे कॉमेडी’ कार्यक्रमाची निर्मिती करत असून अमोल जाधव दिग्दर्शन करत आहेत. कार्यक्रमात उत्साही भर म्हणून एक सुंदर तरुणी कार्यक्रमाच्या आकर्षक सूत्रसंचलनाने प्रेक्षकांवर भुरळ पाडणार आहे. कार्यक्रमाच्या प्रत्येक भागात स्पर्धेतून निवडलेल्या तीन कलाकारांचा एक संच असेल. हे नवोदित कलाकार प्रेक्षकांसमोर आपापल्या भागातील अस्सल विनोदाचा तडका सादर करतील.

“'कॅफे कॉमेडी' कार्यक्रमाच्या माध्यमातून गर्दी, वर्दळ असणाऱ्या, गजबजलेल्या शहरांपासून शांतता आणि सुख नांदवणाऱ्या आपुलकीच्या गाव खेड्यांपर्यंत पसरलेल्या भिन्न वर्गातील भिन्न कुटुंबातील व्यक्तींना खळखळून आणि पोटभरून हसवण्याचे आमचे प्रामाणिक उद्दिष्ट आहे. हा उद्दिष्ट नक्कीच साकार होईल अशी आशा आहे.” असे अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेंमेंट प्रा.लिमिटेडचे सी.ई.ओ. श्री. सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले.

Comments

Popular posts from this blog

KERALA TOURISM WOOS TOURISTS

Excellent Classes organises 34th edition of HUES, felicitates its meritorious students

Haier Launches Inverter Expert Air Conditioner Series - A New Dawn in Air Conditioning